By  
on  

लोभस चेह-याची ही अभिनेत्री बनली आहे आनंदी गोपाळमध्ये डॉ. आनंदीबाई जोशी

पहिली महिला स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावर आधारित असलेला सिनेमा आनंदी गोपाळचा टीझर आणि पोस्टर रिलीज झालं. पण प्रत्येकाला आनंदीबाईंची व्यक्तिरेखा कोण साकारणार याची उत्सुकता प्रत्येकालाच होती.
आनंदी गोपाळमध्ये भाग्यश्री मिलिंद ही अभिनेत्री आनंदीबाईंचा रोल साकारणार आहे. भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन ही घटना शेअर केली आहे. भाग्यश्रीने यापूर्वी २०१३ मध्ये आलेल्या ‘बालक पालक’ सिनेमात मुख्य भूमिकेत होती. याशिवाय उबंटू या सिनेमात काम केलं आहे.


आनंदीबाई जोशी वयाच्या अठराव्या वर्षी बोटीने प्रवास करून परदेशी शिक्षणासाठी गेल्या होत्या. नेहमीपेक्षा वेगळ्या वातावरणात राहून, वेगळ्या लोकात राहून आनंदीबाईंनी जिद्दीने वैद्यकिय शिक्षण पूर्ण केलं.

आनंदीबाईंच्या आयुष्यावर आतापर्यंत नाटक आणि मालिका आली आहे. आता सिनेमातून आनंदीबाईंचं व्यक्तिमत्त्व कसं उलगडत जातं ते लवकरच कळेल. हा सिनेमा १५ फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

https://www.instagram.com/p/Bs5YFeDBclC/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive