By  
on  

"शेवंता फक्त नावचं पुरेसं आहे", म्हणतेय शेवंता साकारणारी अपूर्वा नेमळेकर

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडल्या. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या भागात एक असं पात्र समोर आलं जे हटके आहे हे पात्र आहे शेवंताचं. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही भूमिका साकारतेय. या भूमिकेची मालिकेत एन्ट्री झाल्यापासून आत्तापर्यंत शेवंता प्रेक्षकांची आवडती बनली आहे.

नुकतच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.  आणि मालिकेला वेगळं वळणही मिळालय. अण्णा आणि शेवंताचा लग्न सोहळ्याचा सीन आता लक्षवेधी ठरतोय. त्यातच शेवंताचा लग्नातील पेहरावही प्रेक्षकांना आवडतोय. शेवंता या सीनसाठी दागदागिने घालून, साडी नेसून नटलेली पाहायला मिळतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Shevanta ️ bas naam kafi hai ! . . #apurvanemlekar #zeemarathi #shevantalovers #shevantaswag #shevantaisback #shevanta #rkc2

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

शेवंता साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकताच शेवंताच्या नवरी लुकमधील नवा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेलं कॅप्शन मजेशीर आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "शेवंता फक्त नाव पुरेसं आहे."

सध्या सोशल मिडीयावरही शेवंताची आणि तिच्या या लुकची चर्चा आहे. शिवाय नथीचा नखराही या फोटोत पाहायला मिळतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive