By  
on  

अभिनेत्री नम्रता संभेरावच्या घरी येणार छोटा पाहुणा, शेअर केले बेबी शॉवरचे फोटो

कॉमेडी एक्सप्रेसमधून नावारुपास आलेल्या अभिनेत्री नम्रता संभरावच्या घरी छोटासा पाहुणा येणार आहे. अलीकडेच तिचं डोहाळेजेवण अर्थात बेबीशॉवर पार पडलं. हे बेबी शॉवर नम्रता आणि तिच्या नव-यासाठी उत्तम सरप्राईज होतं. कारण हा कार्यक्रम तिच्यासाठी सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी अरेंज केला होता.

आपल्या परफेक्ट विनोदी टाईमिंगमुळे नम्रताने अल्पावधीतच छोट्या पडद्यावर स्थान मिळवलं आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सध्या ती  सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या कार्यक्रमात सध्या ती आपल्याला दिसते. तसेच नुकताच रिलीझ झालेल्या लूझ कंट्रोल ह्या चित्रपटात आपल्याला तिचा अभिनय बघता आला होता.

नम्रताच्या बेबी शॉवरमध्ये  श्रेया बुगडे, हर्षदा खानविलकर, तेजस्विनी पंडित. सुयश टिळक, सुप्रिया पाठारे, आनंद प्रभू, ज्योती चांदेकर, पूजा पवार, ज्योती पाटील, प्रसाद जावडे, खुशबू तावडे व मृणाल देशपांडे यांनी हजेरी लावली होती. तुम्ही नम्रताच्या बेबी शॉवरचे फोटो पाहिलेत का?

Recommended

PeepingMoon Exclusive