By  
on  

प्रार्थना आणि नेहा यांच्यासोबत वैभवची धमाल पहा रेडीमिक्स मध्ये, ट्रेलर रिलीज

लव्ह ट्रॅंगल हा विषय सिनेमांना नवा नाही. पण हाच लव्ह ट्रॅंगल खळखळून हसवणारा असला तर.... रेडीमिक्स सिनेमातही विनोद आणि प्रेम याची उत्तम भट्टी जमली आहे. त्यामुळे एव्हीके फिल्म्सची निर्मिती असलेला रेडीमिक्स रसिकांचं उत्तम मनोरंजन करेल यात शंका नाही.

या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमेय विनोद खोपकर सादर करत असलेल्या या सिनेमात वैभव समीर नावाच्या मुलाची तर नेहा, सानिका आणि प्रार्थना नुपूर नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. नुपूर आणि समीरच्या लव्हस्टोरीमध्ये सानिकाची लुडबूड आणि त्यातून घडणारे विनोदी प्रसंग ट्रेलरमध्ये मनोरंजन करतात.

कृती फिल्म्स आणि सौमिल क्रिएशन हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. ‘कॉफी आणि बरच काही’च्या यशानंतर वैभव आणि प्रार्थना ही रोमॅंटिक जोडी रेडीमिक्स या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन जालिंदर कुंभार यांनी केलं आहे. प्रशांत घैसास आणि सुनील भोसले यांची निर्मिती आहे. हा सिनेमा ८ फेब्रुवारी २०१९ ला रसिकांच्या भेटीला येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZaGNO2BGzYs&feature=youtu.be

Recommended

PeepingMoon Exclusive