By  
on  

अपूर्वा नेमळेकरने वडिलांच्या आठवणीत शेयर केली ही पोस्ट

रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंता भूमिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या भूमिकेमुळे तिला एक वेगळी ओळख मिळाली आहे. मिळालेल्या यशात आनंदी आणि समाधानी असताना अपूर्वाला प्रत्येकवेळी तिच्या वडिलांची आठवण येते. काही वर्षांपूर्वी अपूर्वाच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र अपूर्वाच्या आठवणीत ते कायम असतात.

अपूर्वाने नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. वाळूवर डॅड असं लिहून तिने सेल्फि फोटो क्लिक केलाय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अपूर्वा लिहीते की, "एकमेव माणूस ज्याची मला प्रचंड आठवण येते, पा मी तुमच्यावर खूप प्रेम करते."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The only man I miss the most ️ Paa I love you ! . . #apurvanemlekar #iloveupaa

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

 

अपूर्वाची ही गोड पोस्ट तिच्या चाहत्यांनीही लाईक केली आहे. सोशल मिडीयावर अपूर्वा ही कायम चर्चेत असते. शिवाय तिचे फोटो आणि व्हिडीओही चर्चेत असतात. यावरून शेवंता या भूमिकेची पसंती ही चाहत्यांमध्ये अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive