'तू तू मैं मैं'चा हा व्हिडीओ पाहून शिका मास्क घालण्याची कला, सचिन पिळगावकरांनी पोस्ट केला व्हिडीओ

By  
on  

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध गोष्टींची काळजी घेतली जात आहे. मास्क घालण्यापासून ते सॅनिटायझर वापरण्यापर्यंत काळजी घेण्याचं आवाहन कित्येक जण करत आहेत. यातच अभिनेता सचिन पिळगावकर यांनी मास्क कसा घालावा याचे धडे दिले आहेत.

'तू तू मैं मैं'  ही सचिन पिळगावकर यांची मालिका प्रचंड गाजली होती. सासु-सूनेच्या नात्यातली गंमत या मालिकेत पाहायला मिळाली होती. अभिनेत्री रिमा लागू आणि सुप्रिया पिळगावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत होत्या. याच मालिकेचा एक सीन सचिन पिळगावकर यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या सीनमध्ये दोघी एकमेकिंना मास्क घालताना दिसत आहेत. 

हा गमतीशीर व्हिडीओ मास्क कसा घालावा यासाठी मदत करेल असं पिळगावकर या पोस्टमध्ये म्हणत आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये लिहीलय की, "हे 1995 सालचं आहे. जे मास्त कसा घालावा या गोंधळात आहेत, त्यांनी सुप्रिया आणि रिमाचा हा 'तू तू मैं मैं' शोमधील व्हिडीओ पाहावा. चांगले जुने दिवस. रिमाची आठवण येते."

 

हा व्हिडीओ पोस्ट करून अभिनेत्री रिमा लागू यांची आठवण येत असल्याचही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलय. मात्र सचिन यांनी पोस्ट केलेला हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांना आवडलाय.

 

Recommended

Loading...
Share