अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची नांदेडमध्ये आत्महत्या

By  
on  

“खुलता कळी खुलेना” मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे. आशुतोष भाकरे हा देखील अभिनेता होता. त्याने राहत्या घरी गळफास घेऊन त्याचं जीवन संपवलं. 

या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या वृत्ताने मयुरीच्या चाहत्यांसह मराठी कलाविश्वाला धक्का बसला आहे. 

 

आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओदेखील शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो याबाबत विश्लेषण करताना दिसली होती.

Recommended

Loading...
Share