मयुरीने २०१६ मध्ये आशुतोष भाकरेसोबत लग्नगाठ बांधली होती, फोटोंमध्ये पाहा त्यांची जबरदस्त केमिस्ट्री

By  
on  

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने गळफास लावून आत्महत्या करणं, हे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर दुसरी चटका लावून जाणारी घटना. अभिनेता आशुतोष भाकरेची ही अशी अकाली एक्झिट संपूर्ण मराठी सिनेविश्वाला हादरवून गेली. 

‘खुलता खळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती अभिनेता आशुतोष भाकरे याने नांदेडमधील राहत्या घरात आत्महत्या केल्याचं समोर आलं

 

 आशुतोष हा ३२ वर्षांचा होता. त्याने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. 

 

20 जानेवारी 2016 रोजी मयुरी आणि आशुतोष लग्नाच्या बेडीत अडकले होते.

 आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर ‘खुलता कळी खुलेना’मधून मयुरी घराघरात पोहचली.

 

 मयुरीने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘डिअर आजो’ रंगभूमीवर चांगलेच गाजले. तर लॉकडाउनपूर्वी रंगभूमीवर आलेल्या ‘तिसरे बादशाह हम’ या ती काम करत होती.

आशुतोष सोबतची तिची लव्हस्टोरी मयुरीने व्हॅलेंटाईनडे निमित्त २०१७ साली एका आघाडीच्या वृत्तपत्रासोबत शेअर केली होती.

 

प्रत्येक फोटोंमधून आशुतोष आणि मयुरीची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. आशुतोष पहिल्याच भेटीत मयुरीच्या प्रेमात पडला होता. 

लॉकडाउनमुळे आशुतोष आणि मयुरी हे दोघे त्यांच्या नांदेडमधील घरीच राहत होते.

Recommended

Loading...
Share