पाहा Photos : अभिनेत्री प्रिया आणि शंतनु या ठिकाणी पोहोचले ट्रेकिंगसाठी

By  
on  

सध्याच्या परिस्थितीत एकीकडे लोकं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळत आहेत. त्यातच अभिनेत्री प्रिया मराठे आणि शंतनु मोघे यांनी ट्रेकिंगला जाण्याचं ठरवलं. यासाठी दोघही सिंहगडावर पोहोचले. नुकतच प्रिया आणि शंतनुने त्यांच्या या ट्रेकिंगचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

प्रियाने या निमित्ताने पहिल्यांदाच सिंहगड पाहिला. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "मी इतक्यांदा पुण्याला आले आहे पण सिंहगड पाहण्याची वेळ कधीच आली नव्हती..अखेर काल तो दिवस उजाडला आणि मी सिंहगड पहिला, नुस्ता पहिलाच नाही तर अनुभवला...सुख..सव्वा तासाचं कठीण पण अतिशय रम्य, सुंदर दृष्यांनी भरलेलं , हिरव चढण.. !गडाच्या दरवाज्यापाशी दमून बसले पण मन उत्साह आणि आनंदानी भरून वाहत होतं.."

तर शंतनु कित्येक वर्षांनी सिंहगडावर गेला होता. तो लिहीतो की, " सिंहगड..अनेक वर्षांनंतर सिंहगड ची न्यारी खुमारी अनुभवली..निसर्ग हिरवा.. शिव विचार भगवा, जय शिवराय, नरवीर तानाजी मालुसरे ह्यांना मानाचा मुजरा."

सिंहगड अनुभवल्यानंतरचा आनंद आणि उत्साह प्रिया आणि शंतनु या जोडीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत असल्याचं या फोटोंमध्ये पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share