'अजुनी' हा नवा-कोरा मराठी सिनेमा लवकरच, हा अभिनेता प्रमुख भूमिकेत

By  
on  

 'अजुनी'  हा नवा कोरा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या  भेटीला येतोय. सोशल मिडीयावर नुकतीच या सिनेमाची घोषणा झाली. अंजली, अस्मिता या मालिकांमधून घराघरांत पोहचलेला अभिनेता पियुष रानडे या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तर संघर्षयात्रा, शिव्या असे उत्तम चित्रपट केलेला दिग्दर्शक साकार राऊत एक अनोखी कथा  या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर सादर करत आहे.

या चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. मावळतीचा सूर्याच्या तेजानं उजळलेलं नभांगण आणि त्यात उभा असलेला तरुण असं हे पोस्टर खूप अर्थपूर्ण आहे. परंतु सिनेमाचं कथानक अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

अर्थ स्टुडिओज आणि सारा मोशन प्रा.लि. यांनी अजूनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ध्वनि साकार राऊत आणि साकार राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा इतर चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा ठरणार आहे, असा निर्मात्यांचा मानस आहे. सर्वांनाचा 'अजुनी' या सिनेमाची उत्सुकता लागून  राहिली आहे. 

Recommended

Loading...
Share