काहीतरी आशयघन करण्याच्या जाणिवेतून निर्मिलेलं, 'सुभाशय' : ज्योती सुभाष

By  
on  

अभिनेत्री अमृता सुभाषने 31 जुलै रोजी आई आणि अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी खास घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी आज ही महत्त्वपूर्ण घोषणा सोशल मिडीयाच्या माध्यमातून  केली आहे. लवकरच कार्यकर्ते आणि प्रसिध्द लेखक हमीद दलवाई यांच्यावरची एक डॉक्युमेंटरी लवकरच सोशल मिडीयावर त्या घेऊन येणार आहेत. 

ज्योती सुभाष म्हणतात,  "सामाजिक जाणिवा, कला जाणिवा ,साहित्यीक जाणिवा असतात, त्या दृष्टीने आम्ही गेली कित्येक वर्ष काम कतोय. म्हणूनच  नाटक, चित्रपटांमध्ये काम करताना अजून काहीतरी आशयघन करण्याच्या जाणिवेतून निर्मिलेलं, 'सुभाशय' घेऊन येतोय.. पुढील माहिती लवकरच!"

 

एव्हरग्रीन ज्योती सुभाष यांचा या वयातला उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्याच्या 'सुभाशय'ला पिपींगमून मराठीतर्फे खुप खुप शुभेच्छा..आम्ही या डॉक्युुमेंटरीसाठी खुप खुप उत्सुक आहोत. 

Recommended

Loading...
Share