अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणते, "बटा काढत, नटून फिरण्याचे माझ्यात संयम नाहीत"

By  
on  

लॉकडाउननंतर आता मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली असून या कार्यक्रमाचे नवे भाग प्रसारित होत आहेत. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी सुत्रसंचालकाच्या भूमिकेत आहेत. 

या कार्यक्रमासाठी प्राजक्ता निरनिराळ्या वेशभुषेत आणि लुकमध्ये दिसते. नुकताच तिने असाच एक वेगळा लुक केला होता. केसांच्या बटा काढलेला हा लुक होता. या लुकचे फोटो प्राजक्ताने नुकतेच सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

ती या पोस्टमध्ये म्हणते, "बट ऑबवियस... हास्यजत्रेसाठी नटले. याशिवाय बटा काढत, नटून फिरण्याचे माझ्यात संयम नाहीत आणि तो हा “काळही” नाही..."

हा खास लुक फक्त हास्यजत्रा कार्यक्रमासाठी असल्याचं ती सांगते. मात्र खऱ्या आयुष्यात असं नटून फिरायला आवडत नसल्याचं प्राजक्ता या पोस्टमध्ये म्हणतेय.

Recommended

Loading...
Share