पाहा Photos : लग्नाच्या सहा महिन्यांनंतर परी तेलंगने पोस्ट केले लग्नाचे हे फोटो

By  
on  

लक्ष्य मालिकेत लक्षवेधी भूमिका साकारणारी अभिनेत्री परी तेलंगने नुकतेच सोशल मिडीयावर तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. याचवर्षी 31 जानेवारी रोजी परी आणि सिद्धेश शिरगावकर यांचं लग्न पार पडलं होतं. त्यांच्या लग्नाला नुकतेच 6 महिने पूर्ण झाले आहेत. 

या निमित्ताने परी तेलंगने तिच्या लग्नाचे अनसीन म्हणजेच याआधी पोस्ट न केलेले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

या पोस्टमध्ये ती लिहीते की, "आम्ही या प्रवासाची सुरुवात खूप प्रेमाने, आनंदाने, हसत आणि प्रियजनांच्या आशिर्वादाने केली होती. माझ्या आयुष्यातील या खास दिवशी जेव्हा मला माझा जोडीदार भेटला होता. याच दिवशी सहा महिन्यांपूर्वी."

 परी तेलंगने या लग्नातील काही खास आठवणी असलेले फोटो पोस्ट केले आहेत.

Recommended

Loading...
Share