घरातच असा सुरु आहे अभिनेता आदिनाथ कोठारेचा व्यायाम

By  
on  

सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत  वर्कआउट करण्यासाठी जीम बंद आहेत. मात्र फिटनेसप्रेमी घरातच व्यायाम करताना दिसत आहेत. निरोगी आरोग्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरात योगा, व्यायाम या गोष्टी केल्या जात आहेत.

अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील घरातच गेल्या काही महिन्यांपासून घरातच व्यायाम करतोय. नुकताच आदिनाथने सोशल मिडीयावर त्याचा फिट लुक पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये आदिनाथ वर्कआउट करताना दिसतोय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I like pleasure spiked with pain and music is my aeroplane #homegym #music #weekendvibes

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

'83' या आगामी हिंदी सिनेमात आदिनाथ झळकणार आहे. 1983 मध्ये भारतीय संघाने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकप सामन्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात आदिनाथ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Recommended

Loading...
Share