या अभिनेत्रीमुळे सचिन पिळगावकर यांना निर्माण झाली उर्दू भाषेची आवड, शेयर केली आठवण

By  
on  

अभिनेता सचिन पिळगावकर यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. बालकलाकार म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं होत. 'मझली दीदी' या सिनेमाच्या निमित्ताने सचिन अभिनेत्री मीना कुमारी यांच्यासोबत झळकले होते. ते त्यांना मीना आपा असं म्हणत

'मझली दीदी' या सिनेमातील एक सीन सचिन यांनी इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. मीना कुमारी यांच्या आठवणीत त्यांनी ही पोस्ट लिहीली आहे. ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "मीना आपा यांच्यासोबतच्या आठवणी. माझी मीना आपा. हा व्हिडीओ 'मझली दीदी' सिनेमातील आहे. मला त्यांची आठवण येते. मी भाग्यवान आहे की मला त्यांच्यासोबत स्क्रिन शेयर करण्याची संधी मिळाली होती.  ट्रॅजेडी क्विन म्हणून त्यांची ओळख होती ज्या नेहमी माझ्या चेहऱ्यावर हसू आणायच्या. माझ्या मनात उर्दूविषयी त्यांनीच प्रेम निर्माण केलं होतं जे आता माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी मला अशी भेटवस्तू दिली आहे जी माझ्याकडून कुणीही काढून घेऊ शकत नाही. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी हेच म्हणू शकतो की मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि नेहमीच त्यांचा आदर करतो."

 

 सचिन यांनी मीना कुमारी यांची ही गोड आठवण शेयर करत त्यांनी हा व्हिडीओ शेयर केला आहे. सचिन हे उत्तम उर्दू बोलतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र या ऊर्दु भाषेविषयीचं प्रेम त्यांच्यात मीना कुमारी यांच्यामुळे निर्माण झाल्याचं ते सांगतात.

Recommended

Loading...
Share