By  
on  

सेटवर पाठकबाई लुटत आहेत पावसाळी वातावरणाची मजा, पोस्ट केला हा फोटो

'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका इतक्या वर्षांनंतरही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांचं भरपुर प्रेम मिळालं. आणि अजूनही या मालिकेत येणारे विविध ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला आवडतात. या मालिकेप्रमाणे मालिकेतील भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. त्यापैकीच एक भूमिका आहे पाठकबाईंची. ही भूमिका साकारते अभिनेत्री अक्षया देवधर.

कोल्हापुरात या मालिकेचं चित्रीकरण सुरु असतं. लॉकडाउनच्या ब्रेकनंतर पुन्हा या मालिकेचही चित्रीकरण सुरु करण्यात आलं आणि कलाकारही सध्या चित्रीकरण करताना आनंदी दिसत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I am me , Nothing more, Nothing less, And that is enough! ️ #TJR

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

 

असाच चित्रीकरणादरम्यानचा सेटवरील फोटो अक्षया देवधरने पोस्ट केला आहे. सध्या चित्रीकरणासाोबतच पावसाळी वातावरणाची अक्षया मजा लुटत असल्याचं चित्र पाहायला मिळतय. या पोस्टमध्ये ती लिहीते की,"मी मी आहे, जास्त नाही, कमी नाही, आणि ते पुरेसं आहे."

अक्षयाच्या चाहत्यांनाही पाठकबाईंच्या लुकमधील तिचा हा फोटो आवडला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive