By  
on  

रोमँटिक 'नाखवा' गाणं प्रदर्शित, गाण्यात अक्षय आणि समृद्धीचा रोमान्स

सिनेमातील गाण्यांसह म्युझिक व्हिडीओ गाणी देखील लोकप्रिय असतात आणि ती प्रेक्षकांना आवडतात. त्यातच काही आग्री, कोळी गाणीही प्रेक्षकांना रिफ्रेश करतात. असचं एक फ्रेश गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. नाखवा असे या गाण्याचं नाव आहे. हे एक आग्री कोळी रोमँटिग गाणं असून व्हिडीओ पॅलेसच्या या गाण्यात अभिनेता अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर पाहायला मिळत आहेत. 

 या गाण्यात एक तरुण जोडी प्रमेकथा आहे आणि त्यांचा रोमान्स आहे.. स्वत:चं घर असावं अशी इच्छा असणाऱ्या आपल्या प्रेयसीचं स्वप्न तो मुलगा कसं पूर्ण करतो ते या गाण्यात दाखवलं गेलं आहे. नारळी पौर्णीमेच्या मुहुर्तावर या गाण्याचा टीजर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता आणि नुकतच हे गाणं प्रदर्शित झालं आहे. 

 

'नाखवा' या गाण्याचं दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केलं असून शब्दही सचिन आंबात यांचे आहेत. गाण्याचं संगीत अनय नाईक यांचे आहे. केवल वाळंज आणि साधना काकतकर यानी हे गाणे गायले आहे.  तयेच अक्षय केळकर आणि समृद्धी केळकर याच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ह्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन हर्षद वाघमारे यांनी तर संकलन देवा आव्हाड यांनी केले आहे. कला दिग्दर्शनाची जबाबदारी ऐश्वर्या बाचल यांनी सांभाळली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive