By  
on  

शाहरुखचा फॅन आहे मराठमोळा अभिनेता, पाहा व्हिडीओ

सध्या सर्वच मालिका आणि सिनेमांच्या चित्रिकरणाची गाडी रिस्टार्ट झाली आहे. योग्य ती सर्व सुरक्षेची खबरदारी घेत सर्व कलाकारांनी पुनश्च हरिओम म्हटलंय.  मोठ्या प्रदीर्घ कालावधीनंर सेटवर परतल्याचा आनंद प्रत्येकालाच होतोय. त्यातून काम करता करता फावल्या वेळेत धम्माल-म्सती करण्याची मज्जाच वेगळी असते. 

आत्ता आपल्या समरचंच पाहा ना .....मिसेस मुख्यमंत्री मधला सुमीचा पायलट म्हणजेच अभिनेता तेजस देशमुख पावसात बेधुंद होऊन त्याचा सेटवरतीच आनंद घेतोय. इतकंच नव्हे तर शाहरुख खानचा डाय हार्ट फॅन असलेल्या तेजसने शाहरुख स्टाईलचा त्याच्याच गाण्यावरचा स्लो-मोशन व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, तेजसचा हा व्हिडीओ सुमी साकारणारी त्याची को-स्टार अमृता धोंडगेनेच शूट केला आहे. म्हणजेच ऑन स्क्रीन प्रमाणेच ऑफ स्क्रीनसुध्दा त्यांची चांगलीच केमिस्ट्री आहे, असं म्हणायला हरकत नाही.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#SRK Fan ️ . . . Credits : @amrutadhongadeofficial . . . #slowmo #srk #king #️

A post shared by Tejas Barve (@tejas.barve_) on

 

 

 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive