By  
on  

शाहरुख खानच्या ‘क्लास ऑफ 83’ मध्ये पृथ्विक प्रताप साकारतोय ही भूमिका, पाहा लुक

शाहरुख खानच्या ‘क्लास ऑफ 83’ मध्ये पृथ्विक प्रताप या मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी लागल्याचं आपल्या सर्वांनाच माहितीय. या सिनेमातला त्याचा लुक नुकताच प्रदर्शित झाला आहे. खुद्द शाहरुखनेच त्याचा हा लुक सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे. 

सुर्वे या पोलिसाची भूमिका ‘क्लास ऑफ 83’ मध्ये पृथ्विक साकारतो आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्याला स्क्रिन शेअर करायला मिळतेय. 

अभिनयाची आवड असणा-या पृथ्विक प्रतापने मराठी मालिका, सिनेमा, नाटक, लघुपट, वेबसिरीज इत्यादी माध्यमांत काम केले आहे. अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांत पृथ्विकने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘आंबट गोड’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘हम बने तुम बने’ या मराठी मालिकांचाही तो प्रमुख हिस्सा होता. इतकेच नव्ह तर सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व २’ या कार्यक्रमात पृथ्विकने सहभाग घेतला होता आणि तो दुस-या पर्वाचा विजेता देखील ठरला. तसेच त्याने ‘नाईट स्कूल’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ या सिनेमांतही काम केले आहे

 

रेड चिलीझ् एंटरटेनमेंट प्रॉडक्शन, अतुल सभरवाल दिग्दर्शित आणि शाहरुख खान, गौरी खान, गौरव वर्मा निर्मित ‘क्लास ऑफ 83’ या सिनेमात मराठमोळा अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणे ही मराठी सिनेसृष्टीसाठी आणि प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या सिनेमात पृथ्विक, बॉबी देओल, अनुप सोनी, भूपेंद्र जाडावत, निनाद महाजनी, हितेश भोजराज आणि समीर परांजपे या दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive