पुष्कर जोग अशी जोपासणार डान्सची आवड, इथे पाहता येतील त्याचे डान्स व्हिडीओ

By  
on  

अभिनेता पुष्कर जोगला सुरुवातीपासूनच अभिनयासोबतच नृत्याची देखील प्रचंड आवड आहे. त्याच्या सिनेमांमध्ये तो कित्येकदा त्याचं नृत्यकौशल्य दाखवताना दिसला आहे. शिवाय अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्येही पुष्करचे डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाले आहेत. 

पुष्करने त्याचा नृत्याची आवड जोपासण्यासाठी त्याचं स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरु केले आहे. नुकतच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पुष्करने याविषयीची घोषणा केली आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा त्याच्या युट्यूब चॅनेलचा डान्स टिझर आहे. या चॅनेलच्या माध्यमातून पुष्कर जोग त्याने डान्स व्हिडीओ पोस्ट करणार आहे.

 

पुष्करने त्याच्या करियरची सुरुवाती बालकलाकार म्हणून केली आहे. पुष्करने अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वातही पुष्कर स्पर्धक म्हणून होता.

Recommended

Loading...
Share