अभिनेत्री सायली संजीव म्हणते, 'सेफ्टी फर्स्ट'

By  
on  

करोना संकटामुळे जवळपास तीन महिने मालिका, सिनेमे आणि वेबसिरीज या सर्वांचंच शूटींग ठप्प होतं, पण नुकतंच अनलॉकची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यात थोडी शिथिलता आणत काही अंशी योग्य ते सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळत व योग्य ती खबरदारी घेत शूटींगला सुरवात करण्याची मान्यता दिली. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीला हायसे वाटले व प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला. कलाकरांच्या ानंदाला तर पारवाच उरला नाही. पुनश्च हरिओम म्हणत त्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. 

पण घराबाहेर पडताना सर्वात आधी स्वत:ची सुरक्षा महत्त्वाची हे सिनेसृष्टीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री सायली संजीव फक्त सांगतच नाहीय तर तिने प्रत्यक्ष त्याचा पुरावासुध्दा दिला. सायली मास्क लावून घराबाहेर पडल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

• • • #safetyfirst #mask #wearamask #newnormal #love #work #sunday #instagirl #instagood #sayalisanjeev

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official) on

कामं तर सर्वांनाच करायची आहेत. पुन्हा नवी भरारी घ्यायचीय,पण या सगळ्यात स्वत:ची  काळजी सर्वात जास्त महत्त्वाची, हे जेव्हा आपले लाडके कलाकार सांगतात , तेव्हा  ते जास्त पटतं. 

सायलीच्या मास्क परिधान केलेल्या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share