थुकरटवाडीत आलं नाईक कुटुंब, अण्णा आणि माईंची हजेरी

By  
on  

'चला हवा येऊ द्या' या विनादवीरांच्या मंचावर आत्तापर्यंत अनेक कलाकार येऊन गेले आहेत. शिवाय या विनोदवीरांनी अनेक कलाकारांच्या रुपात त्यांच्या नकला आणि त्या भूमिका साकारल्या आहेत. या विनोदी कार्यक्रमात 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील कलाकारांनीही हजेरी लावली होती. मात्र आता पुन्हा नाईक कुटुंब या मंचावर पाहायला मिळणार आहे.

'रात्रीस खेळ चाले'मधील नाईक कुटुंब आता चला हवा येऊ द्याच्या मंचावर येत आहे. मात्र यंदा थेट थुकरवाडीतून प्रेक्षकांना त्यांना पाहता येणार आहे. याचं कारण असं की या कार्यक्रमातील विनोदवीर नाईक कुटुंब साकारणार आहेत. यात अभिनेता कुशल बद्रिके माईच्या भूमिकेत तर भाऊ कदम अण्णांच्या भूमिकेत दिसेल. 

 

नुकतच कुशल बद्रिकेने त्यांच्या या भूमिकेतील पेहरावातील फोटो पोस्ट केला आहे. मात्र आता नाईक कुटुंब येणार म्हटल्यावर शेवंताही येणारच. फोटोत शेवंता कोण साकारतय हे दिसत नसलं तरी यात शेवंताची भूमिका कोण साकारेल हे पाहणं मजेशीर ठरेल. या विनोदवीरांनी याधीही 'रात्रीस खेळ चाले'मधील पात्र या मंचावर साकारली आहेत.

तेव्हा नाईक कुटुंबाचा हा विनोदी परफॉर्मन्स पाहणं मजेशीर ठरेल. 

Recommended

Loading...
Share