नवीन एन्ट्री झालेल्या रुपाली भोसलेसोबत सहकलाकारांची झाली अशी मैत्री, ऑफस्क्रिन करत आहेत अशी धम्माल

By  
on  

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता नव्या संजनाची एन्ट्री झालेली पाहायला मिळतेय. आता अभिनेत्री रुपाली भोसले ही भूमिका साकारतेय. कमी कालावधीतच रुपालीने सेटवर सगळ्यांची मनं जिंकली असल्याचं चित्र पाहायला मिळतय. जसं मालिकेत संजनाचा द्वेष करणारी मंडळी ऑफस्क्रिन मात्र तिच्यासोबत मस्ती करताना दिसत आहेत.

नुकतेच रुपालीने सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. त्यात रुपाली सहकलाकारांसोबत ऑफस्क्रिन मस्ती करताना दिसत आहेत. 

 

ही मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. संजना आणि अनिरुद्ध यांचं लग्न होणार असल्याचं चित्र आहे. मात्र हे लग्न होतं का ? य़ाविषयी आईला म्हणजेच अरुंधतीला कळाल्यावर काय घडतं ? हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

अभिनेत्री दिपाली पानसरे ही भूमिका साकारत होती. मात्र काही कारणास्तव तिला मालिका सोडावी लागली. आणि संजनाच्या भूमिकेत आता रुपालीची एन्ट्री झाली. 

Recommended

Loading...
Share