‘माझा होशील ना’ मध्ये आदीच्या भूमिकेत दिसणार हा होतकरु एक्टर ?

By  
on  

‘माझा होशील ना’ या मालिकेत अभिनेता विराजस कुलकर्णी हा आदी ही व्यक्तिरेखा साकारतोय. अभिनेत्री गौतमी देशपांडेही त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत आहेत. सध्या मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मात्र यातच या मालिकेत आणखीन एक ट्विस्ट येणार असल्याचं अभिनेता विराजसने सांगीतलं आहे. 

विराजसने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं असं लिहीलं आहे की, "आजपासून आदी चा रोल माझ्या ऐवजी हा होतकरू एक्टर करणारे आसं कानावर पडलं.."

 

 

मात्र व्हिडीओ पाहिल्यानंतर विराजसची ही गमतीशीर पोस्ट लक्षात येते. हा होतकरु एक्टर दुसरा कुणी नसून आहे एक गोगलगाय. यात विराजसने चक्क गोगलगायचा व्हिडीओ काढून तो पोस्ट केल्याचं दिसलं. अर्थात सोशल मिडीयावर विराजसने हा व्हिडीओ गंमतीत पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आणि त्यावर लिहीलेलं गमतीशीर कॅप्शन सगळ्यांनाचं आवडलेलं दिसतय.

Recommended

Loading...
Share