By  
on  

अशीच मेहनत आणि महाराजांची सेवा करत राहीन - अंकित मोहन

अभिनेता अंकित मोहन हा फर्जंद या सिनेमानंतर मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या पिळदार शरीरयष्टीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. त्यानंतर फत्तेशिकस्त या मराठी सिनेमातही अंकित झळकला. या सिनेमात अंकितने येसाजी कंक यांची भूमिका साकारली होती. 

 नुकतच अंकितने येसाजी कंक यांच्या पेरहरावातील आणि त्या भूमिकेतील फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये अंकित लिहीतो की, "तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाचं कर्ज आहे माझ्यावर आणि मी त्यासाठी कायम ऋणी असेन. आणि वचन देतो की मी अशीच मेहनत करत राहीन आणि महाराजांची सेवा करत राहीन.छत्रपति शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव ॐ"

'जंगजौहर' या दिगपाल लांजेकर यांच्याच आगामी मराठी सिनेमातही अंकित झळकणार आहे. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive