By  
on  

राणादाच्या आयुष्यात येणार नवी बाई ? 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत जिजाची एन्ट्री

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने आता वेगळं वळण घेतलेलं पाहायला मिळतय. आता या मालिकेत एक नवी एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. ही एन्ट्री आहे जिजाची.

एकीकडे राणाने तालीम आणि मळा एवढचं करण्याचा निर्धार केला आहे. मात्र यात खट्याळ आणि तिखट अंदाजातल्या जिजाची एन्ट्री होते. सहा महिन्यांनी शिक्षा भोगून राणा गावात आलाय. राणाने मनाशी पक्क ठरवलय की पुन्हा बाईच्या नादाला लागायचं नाही. आणि आता फक्त ताली आणि मळ्यात शेतीच करायची. तालमीसाठी तो शेतातली जागा देण्याचं कबुल करतो. पण आता त्या जागेवर तिखट स्वभावाच्या बाईने कब्जा केला आहे. हीच बाई आहे जिजा. अभिनेत्री अक्षया देवधरच जिजाची भूमिका साकारताना दिसतेय. त्यामुळे अंजलीबाई कुठे गेल्या हा प्रश्नही मनात येतो.

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यात जिजाची एन्ट्री झालेली पाहायला मिळतेय. जिजाला पाहून राणा मात्र हैराण झालेला पाहायला मिळतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आजपासून येतेय....

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

 

मात्र आता आयुष्यात वेगळा निर्धार केलेला राणा पुन्हा प्रेमात पडेल का ? जिजाला पाहून राणाला अंजलीबाईंची आठवण येईल का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र आता अंजली नेमकी कुठे गेली, आणि अचानक जिजाची एन्ट्री कशी झाली हे मालिकेच्या पुढील भागांमधून समोर येईलच.

 

Recommended

PeepingMoon Exclusive