पाहा Photos : खऱ्या आयुष्यात हिच्यासाठी वेडा आहे गुरुनाथ, देत आहे #CoupleGoals

By  
on  

अनेक ऑनस्क्रिन जोड्या या लोकप्रिय आहेत. मात्र काही ऑफस्क्रिन म्हणजेच खऱ्या आयुष्यातील जोड्याही लोकप्रिय आहेत. यापैकीच एक जोडी म्हणजे अभिजीत खांडकेकर आणि पत्नी सुखदा खांडकेकर ही जोडी. दोघही अभिनय क्षेत्रात वैविध्यपूर्ण काम करताना दिसतात. मात्र सोशल मिडीयावर ही रियल लाईफ जोडी चर्चेत असते.

नुकतच अभिजीत आणि सुखदाने त्यांचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. हे फोटो कपल गोल्स देत असल्याचं दिसतय.

दोघांचेही हे रोमँटिक फोटो त्यांच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडले आहेत. शिवाय मनोरंजन विश्वातील त्यांच्या मित्रमंडळींनीही या फोटोंना पसंती दिली आहे. 

एकीकडे माझ्या नवऱ्याची बायको मालिकेमुळे अभिजीतची गुरुनाथ अशीच ओळख मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर दुसरीकडे सुखदा तिच्या अभिनयासह नृत्यकौशल्यासाठीही प्रसिद्ध आहे.

Recommended

Loading...
Share