प्रसाद ओकचे हे फोटोच सांगतायत, 'हम भी है जोश में'

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयासोबतच  दिग्दर्शनानेसुध्दा रसिक प्रेक्षकांच्या मनात निर्माण करणारा अभिनेता म्हमजे प्रसाद ओक. अभिनेता प्रसाद ओकच्या भन्नाट कल्पना शक्तीला तोड नाही हे तुम्हाला माहितच असेल. नेहमीच आपल्या नानाविविध भन्नाट पोस्टमुळे सोशल मिडीयावरुन तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो,

महाराष्ट्राची हास्यजत्रा  या विनोदी कार्यक्रमाच्या परिक्षकपदी विराजमान असलेला प्रसाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक स्टायलिश लुक्स पाहायला मिळतो. नुकतंच एक छानसं फोटोशूट त्याने सोशल मिडीयावरुन शेअर केलं आहे. 

महाराष्ट्राची हास्यजत्रा या  शोच्या नुकत्याच एका भागासाठी प्रसादने हा लुक कॅरी केला. ह्या लुकमध्ये प्रसाद भलताच रुबाबदार दिसतोय यात तिळमात्र शंका नाही. 

 

चाहत्यांनी प्रसादच्या या स्टायलिश आणि लय भारी लुक्सवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.  

Recommended

Loading...
Share