By  
on  

सुमी आणि समरने असं केलं बाप्पाचं केलं स्वागत, 'मिसेस मुख्यमंत्री' मालिकेत बाप्पाचं आगमन

मनोरंजन विश्वातही गणेशोत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे. काही कलाकार घरी बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत. तर काही कलाकार त्यांच्या मालिकांच्या सेटवर बाप्पाच्या आगमनाने आनंदी आहेत.

मिसेस मुख्यमंत्री मालिकेच्या सेटवरही बाप्पा विराजमान झाले आहेत.

या मालिकेतील सुमी आणि समरने बाप्पाचं थाटात स्वागत केलं आहे.

यावेळी सुमी आणि समर पारंपारिक वेशभुषेत दिसले. मालिकेतील गणपती स्पेशल भागाचं चित्रीकरण होत असल्याने सेटवरही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय.

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत नेहमीसारखी वर्दळ आणि पाहुण्यांची गर्दी नसली तरी गणेशभक्तांचा उत्साह कायम आहे. मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने सेटवर बाप्पाचं आगमन झाल्याने कलाकार मात्र आनंदी आहेत. त्यामुळे सेटवरचं बाप्पाची मनोभावे पूजा केली जात आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive