By  
on  

दिग्दर्शक दिगपाल लांजेकरला या खास मित्राकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रसिद्ध दिग्दर्शक दिगपाल लांजेकरला वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावरून शुभेच्छा मिळत आहेत. मात्र त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहीली आहे. अभिनेता हरिश दुधाडेने त्याच्या खास मित्रासाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. दिगपाल आणि हरिशची सात वर्षांपासूनची मैत्री आहे.

हरिशने दिगपालसोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शमध्ये हरिश लिहीतो की, "आठवतोय का हा फोटो दिगपाल, एकत्र असे खूप फोटो आहेत ..पण हा आम्ही खास काढून घेतलेला आमचा फोटो . ७ वर्षांपासूनच्या या नात्या मधे ऊन पाऊस सगळंच सोबत पहिलं आणि पुढेही पाहू... पण आजचा दिवस खास आहे कारण आज भाऊंचा वाढदिवस आहे...आजच्या या मुहूर्तावर तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा... देव तुला उदंड आयुष्य देवो..हर हर महादेव... चांग भलं.."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आठवतोय का हा फोटो @digpalofficial एकत्र असे खूप फोटो आहेत ..पण हा आम्ही खास काढून घेतलेला आमचा फोटो ( pc - @himanshuambekar ) ७ वर्षांपासूनच्या या नात्या मधे ऊन पाऊस सगळंच सोबत पहिलं आणि पुढेही पाहू... पण आजचा दिवस खास आहे कारण आज भाऊंचा वाढदिवस आहे... आजच्या या मुहूर्तावर तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा... देव तुला उदंड आयुष्य देवो.. हर हर महादेव... चांग भलं.. #birthdayboy #bhauchabirthday #digpallanjhekar #director #actor #writer

A post shared by Harish Dudhade (@harishdudhade_official) on

 

दिगपालच्या अनेक सिनेमांमध्ये हरिशची महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली आहे. हरिश एक उत्कृष्ट अभिनेता असून दिगपालच्या 'फत्तेशिकस्त', 'फर्जंद' या सिनेमांमध्येही त्याने उत्तम भूमिका साकारल्या आहेत.

शिवाय दिगपालच्या ऐतिहासिक सिनेमांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. दिगपालच्या आगामी 'जंगजौहर' सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive