By  
on  

डान्स Video : पुष्कर जोगच्या नव्या व्हिडीओत दिसणार ही नृत्यांगना ?

अभिनेता पुष्कर जोगने लॉकडाउनच्या काळात युट्यूब प्लॅटफॉर्मवर येण्याचा निर्णय घेतला. लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकार युट्यूब प्लॅटफॉर्मकडे वळताना दिसले. पुष्करनेही त्याचं युट्यूब चॅनल सुरु केलं. या चॅनेलवर पुष्कर त्याचे डान्स व्हिडीओ पोस्ट करतो.

नुकतेच पुष्करने त्याचे काही डान्स व्हिडीओ पोस्ट केले आहेत. मात्र सध्या उत्सुकता आहे त्याच्या आगामी डान्स व्हिडीओची. ज्याचा टिझर पुष्करने नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या टिझरमध्ये लावणी डान्स पाहायला मिळतोय. मात्र या व्हिडीओत डान्स करणाऱ्या नृत्यांगनाचा चेहरा झाकण्यात आला आहे. आता ही नृत्यांगना नेमकी कोण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलाय.

 

पुष्करच्या या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. कित्येक चाहत्यांनी तर चक्क हा पुष्करचं या वेशात असल्याचं म्हटलय. तेव्हा पुष्करचं स्वत: लावणीच्या वेशभुषेत तर नाही ना असा प्रश्नही सध्या पडलाय. मात्र जेव्हा हा पूर्ण व्हिडीओ समोर येईल तेव्हा या नृत्यांगनाचा चेहरा समोर येईल.

पुष्करने ही पोस्ट करुन लिहीलय की, "ओळखा पाहू कोण ? उद्या येतोय माझ्या युट्यूब चॅनेलवरील नवा व्हिडीओ." तेव्हा पुष्कर चाहत्यांसाठी नेमकं काय सरप्राईज घेऊन आलाय हे व्हिडीओ रिलीज झाल्यावर समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive