सुबोध भावेने शेअर केल्या त्याच्या आईने साकारलेल्या या खास कलाकृती

By  
on  

असं म्हटलं जातं की, शिकायची इच्छा असलेला माणूस वयाच्या अखेरपर्यंत विद्यार्थीच राहतो. प्रत्येकवेळी तो नवीन काहीतरी शिकत जातो. अभिनेता सुबोध भावेलाही सध्या अनुभव येतो आहे.  सुबोधची आई शिक्षिका आहे हे माहीत आहेच. पण निवृत्त झाल्यानंतर त्या सध्या चित्रकलेचं शिक्षण घेत आहेत. सुबोधने त्यांच्या या कलेचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

 

 

सुबोध म्हणतो, ‘शिक्षण हे आयुष्यभर सुरूच असतं" ३५ वर्ष नोकरी करून निवृत्ती स्वीकारल्यावर आमच्या मातोश्री सध्या चित्रकलेच शिक्षण घेत आहेत . अगदी क्लास वगैरे लावून. आता आईकडून नाही शिकायचं तर कोणाकडून’ यासोबतच सुबोधने आईने काढलेली काही चित्रंही चाहत्यांशी शेअर केली आहेत.

Recommended

Loading...
Share