Video: ही अभिनेत्री म्हणते, महिलांकडे हे लायसन्स अधिकृतरित्या आहे

By  
on  

अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मिडीयावर खुप एक्टीव्ह असते. अनेक सुंदर फोटो शेअर करण्यासोबतच कवी हूॅं में...म्हणत हेमांगी छान कवीतासुध्दा करते. नुकतेच काही गाण्यांचे व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. त्यात महिलांकडे हे लायसन्स अधिकृतरित्या आहे म्हणत हेमांगीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्हालाही वाटलं असेल की, हेमांगी अशा कुठल्या लायसन्सबद्दल बोलतेय. 

गंमत म्हणजे हेमांगीने प्रसिध्द हिंदी गाणं में सोला बरस की...तुम सतरा बरस कें या गाण्याचा इन्स्टाग्राम रील व्हिडीओ शेअर केला आहे, म्हणूनच तिने या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटलंय, महिलांना आपलं वय लपवून ठेवण्याचा अधिकार आहे आणि हे अधिकृतच आहे.

हेमांगीच्या या धम्माल व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसंच हेमांगीने एक इशारासुध्दा दिला आहे. ती म्हणते, तिला तिचं वय विचारण्याचं धाडस अजिबात करु नका. 

 

 

 हेमांगी अलिकडेच झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत रागिणी शिंदे या विशेष भूमिकेत झळकली होती. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. सर्वांनाच आता हेमांगीच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Recommended

Loading...
Share