Video: चाहत्याने दिलेली ही भेट पाहून संस्कृती बालगुडेचं मन भरुन आलं

By  
on  

प्रत्येक कलाकारासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते त्याचं चाहत्यांकडून होणारं कौतुक. सोशल मिडीयामुळे आज चाहते आणि कलाकार यांच्यातलं अंतर खुपच कमी झालं आहे. चाहते थेट आपल्या लाडक्या कलाकाराशी व्यक्त होऊ शकतात. त्यांच्या प्रतिक्रीया मांडू शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना खास भेटही देऊ शकतात. ही भेट अर्थातच एखाद्या कलेच्या स्वरुपातली असते. 

अशाच एका चाहत्याच्या अप्रतिम कलेमुळे अभिनेत्री संस्कृती बालगुडेचं मन भरुन आलं आहे. माही नावाच्या आर्टिस्टने संस्कृतीला हे सुंदर आर्ट भेट दिलं आहे. या कलाकाराच्या कलेचं संस्कृतीने भरभरुन कौतुक तर केलंच पण तिचंच हे आर्ट पाहून तिचं मन भरुन आलं. 

 

 

अनेक चाहत्यांनी संस्कृतीच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

Recommended

Loading...
Share