By  
on  

सलील कुलकर्णी यांनी शेअर केलं ‘दिवेलागण’ मधील पहिलं गाणं

प्रसिध्द संगीतकार, गायक आणि दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमाबद्दलचे , गाण्यांचे, लाईव्ह कॉन्सर्टचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहचवत असतात आणि चाहतेसुध्दा त्यांना भरभरुन दाद देतात. आताही सलील एका वेगळ्या प्रयोगासह चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. आरती प्रभू आणि ग्रेस यांच्या कवितांना सुरांच्या कोंदणात बसवून सलील चाहत्यांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ‘दिवेलागण’ या अल्बममध्ये हे अनुभवता येणार आहे. यातील पहिलं गाणं म्हणजेच आरती प्रभूंची कविता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या गाण्याबाबत सलील सांगतात, ‘" नुस्ते नुस्ते "ही आरती प्रभूंची कविता आणि " कधी माझी कधी त्याचीही सावली " ही त्यांचीच दुसरी कविता एकाच वेळी डोक्यात होत्या. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दिवेलागण - गाणं १ नुस्ते नुस्ते नभ निळे , सकाळ सरून नुस्ता तरी पक्षी बसे झाडांत शिरून नुस्ती निळी नदी मागे पुढे गेला पूर नुस्ते नुस्ते घर नाही , छपराशी धूर ... आरती प्रभू . केवळ आकाश निळं आहे म्हणून ह्या प्रहराला सकाळ म्हणायचं का ? आहे का काही नवी " सकाळ " म्हणण्यासारखं ? का "सकाळ" निघून गेली,नुसतंच निळं आकाश आपल्या समाधानासाठी ठेवून ? मग आपण सुद्धा आपापली जागा पकडून बसायचं ? झाडाने झाडासारखं वागायचं आणि पक्ष्याने पक्ष्यासारखं ... !! मजा येत नाहीये दोघांनाही , झाडाला झाड पणाची आणि पक्ष्याला पक्षी असण्याची .... सगळं आहे .. दिसतंय तसंच नेहमीसारखं पण उसळून नाही येते काहीच .. जगण्यातलं धावणं , उड्या मारणं संपलं ? सगळा खळखळाट निघून गेला ... आता एखाद्या म्हातारीने खाटेवर बसून खिडकीतून बाहेर पाहत राहावे तशी नदी ... तशी माणसं .. तसं जगणं !! भींती आहेत .. छप्पर आहे .. .. पहारे देणाऱ्या खिडक्या , दारं जागच्या जागी आहेत .. पण घरपण नाही .. सगळे पुतळे वावरतात पण वावर नाही श्वासांचा .. हुंदके नाहीत.. उसासे नाहीत .. आणि शृंगार सुद्धा नाही .. !! " नुस्ते नुस्ते "ही आरती प्रभूंची कविता आणि " कधी माझी कधी त्याचीही सावली " ही त्यांचीच दुसरी कविता एकाच वेळी डोक्यात होत्या , " कधी माझी कधी त्याचीही " चं गाणं झालं .. सगळीकडे पोहोचलं .. अगदी ज्यांच्यामुळे आरती प्रभूंचं वेड लागलं त्या हृदयनाथजींचं लाडकं झालं ते गाणं .. पण ह्या " नुस्ते नुस्ते नभ निळे " चा मुखडा सुचला आणि अंतरे नाही सुचले .. !! मला अंतरे संगीतबद्ध करायची घाई करायला आवडत नाही .. गाण्याचा मुखडा चांगला हवाच पण अंतरे जमले तर गाणं टिकतं , रुजतं असा माझा अनुभव आहे . मुखड्याचीच खोली अंतऱ्यात मिळेपर्यंत थांबलो मी .. !! जवळ जवळ सात वर्ष मी ही मनांत घोळवत होतो आणि गेल्या काही महिन्यांत ह्याचे अंतरे सुचले .. अंतरे तुम्ही गाण्यात ऐका आणि त्यातले शब्द आणि चाल ह्याविषयी सविस्तर बोलूच .. पण कधीकधी वेगळाच योग्य असतो , म्हणजे .. बोरकरांच्या दोन कविता .. " आयुष्याची आता झाली उजवण " आणि संधीप्रकाशात अजून जो सोने ह्या एकत्र आणाव्याश्या वाटल्या तशीच ह्या " नुस्ते नुस्ते " च्याच रंगाची , तेवढीच अस्वस्थ करणारी एक आरती प्रभूंची कविता मला सापडली आणि मग दोन कविता ह्यात एकत्र ध्वनिमुद्रित केल्या .. ( लिंक in bio )

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial) on

 

 " कधी माझी कधी त्याचीही " चं गाणं झालं .. सगळीकडे पोहोचलं .. अगदी ज्यांच्यामुळे आरती प्रभूंचं वेड लागलं त्या हृदयनाथजींचं लाडकं झालं ते गाणं .. पण ह्या " नुस्ते नुस्ते नभ निळे " चा मुखडा सुचला आणि अंतरे नाही सुचले .. !! 
मला अंतरे संगीतबद्ध करायची घाई करायला आवडत नाही .. गाण्याचा मुखडा चांगला हवाच पण अंतरे जमले तर गाणं टिकतं , रुजतं असा माझा अनुभव आहे . मुखड्याचीच खोली अंतऱ्यात मिळेपर्यंत थांबलो मी .. !!जवळ जवळ सात वर्ष मी ही मनांत घोळवत होतो आणि गेल्या काही महिन्यांत ह्याचे अंतरे सुचले ..

 

 

अंतरे तुम्ही गाण्यात ऐका आणि त्यातले शब्द आणि चाल ह्याविषयी सविस्तर बोलूच .. पण कधीकधी वेगळाच योग्य असतो , म्हणजे .. बोरकरांच्या दोन कविता .. " आयुष्याची आता झाली उजवण " आणि संधीप्रकाशात अजून जो सोने ह्या एकत्र आणाव्याश्या वाटल्या तशीच ह्या " नुस्ते नुस्ते " च्याच रंगाची , तेवढीच अस्वस्थ करणारी एक आरती प्रभूंची कविता मला सापडली आणि मग दोन कविता ह्यात एकत्र ध्वनिमुद्रित केल्या .. ‘ आता चाहते दिवेलागणच्या पुढील गाण्यासाठी उत्सुक असतील यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive