सुमीत राघवनच्या घरी आला नवा पाहुणा, शेअर केला हा फोटो

By  
on  

अभिनेता सुमीत राघवन याला प्राण्यांची आवड आहे. सुमीतसाठी प्राणीही त्याच्या कुटुंबाप्रमाणेच आहेत. सुमीतला काही दिवसांपुर्वीच एक मांजराचं पिल्लू सापडलं होतं. त्याला घरी आणत त्याने तिचं नाव मिष्टी ठेवलं होतं. आता एक नवा पाहुणा सुमीतच्या घरी आला आहे. चिन्मयीला शुटिंगवरून घरी येताना कुत्र्याचं गोड पिल्लू मिळालं. या नव्या पिल्लाचं नाव सुमीतने शिफू ठेवलं आहे. तर सुमीतकडे आधीपासूनच रिक नावाचं मांजर आहे. 

 

 

सुमीतला आता नव्या शिफूसोबत रिक आणि मिष्टी कशाप्रकारे जुळवून घेतात याची उत्सुकता आहे. याशिवाय सुमीतने तारा नावाची बिबट्या मादीही दत्तक घेतल्याचं सांगितलं होतं.

Recommended

Loading...
Share