By  
on  

Photo: लाडक्या भाऊ कदम यांचा हा डॅशिंग अंदाज पाहिलात का?

अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लाडके विनोदवीर म्हणजे भालचंद्र पांडुरंग कदम हे भाऊ कदम म्हणूनच लोकप्रिय आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना भाऊ म्हणूनच ओळखतो. याच आपलेपणाने भाऊंनी असंख्य चाहत्यांची आजवर मनं जिंकली आहेत.भन्नाट विनोद, विनोदाचं अचूक टायमिंग, पंचेस आणि सोबतीला दरवेळेस भन्नाट लुक्समधून भाऊ प्रेक्षकांसमोर येतात व जिंकूनच जातात, हे ठरलेलं समिकरण आहे. 

काळाच्या गरजेनुसार  सोशल मिडीयावर  अधुन-मधून सक्रीय असणा-या भाऊंनी नुकताच त्यांचा एक जबरदस्त फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

एका स्टायलिश बाईकवर गॉगल लावून स्वार झालेले भाऊ कदम लय भारीच दिसतायत. बहुधा हा फोटो त्यांच्या परदेशवारीचा आहे. तासाभराच्या आतच भाऊंच्या ह्या कडक फोटोवर दहा हजाराहून अधिक लाईक्सचा वर्षाव झालाय आणि अजून तो सुरुच आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial) on

एकेकाळी अभिनयात जम बसत नसल्याने या क्षेत्राला रामराम ठोकण्याचा  विचार भाऊंनी केला होता. पण त्यांच्या अभिनयाचं गाडं हळूहळू रुळावर येत ते आज महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive