By  
on  

उर्मिला आणि आदिनाथ कोठारेची मुलगी जिजाने असा लुटला पावसाचा आनंद

अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मिडीयावर मुलगी जिजासोबतचे अनेक व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. उर्मिलाने नुकताच एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत मुलगी जिजा पावसात मनसोक्त भिजत आनंद लुटताना दिसत आहे. 

पावसाच्या जोरदार कोसळणाऱ्या सरींचा आनंद जिजा लुटताना या व्हिडीओत दिसत आहे. एकीकडे जोरदार पावसाने मुंबईची तुंबई होत आहे तर दुसरीकडे लहान मुलं घरात बसूनही पावसाचा आनंद लुटत आहेत. आदिनाथ कोठार आणि उर्मिलाची मुलगी जिजा ही देखील आई-वडिलांप्रमाणे प्रसिद्ध आहे. सोशळ मिडीयावर तर जिजाचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत असतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

️️️ Enjoying the last rains of 2020...

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare) on

 

उर्मिलाही जिजाच्या विविध गोष्टी सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसते. जिजाविषयीच्या प्रत्येक गोष्टी उर्मिला तिचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेयर करत असते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive