By  
on  

Exclusive: 'इडीयट बॉक्समध्ये पुष्कर जोग या व्यक्तिरेखेतच, पण भन्नाट मनोरंजनाची तुम्हाला देतो गॅरण्टी'

प्रेम करणं आणि ते पूर्णत्वाला नेणं  वाटतं तितकं सोपं नाही असं म्हटलं जातं. काळ कितीही बदलला असला तरी अनेकांच्या नशिबी प्रेमाची सत्वपरीक्षा आजही आल्याचं पाहायला मिळतं. अशाच प्रेमावर आधारित ‘इडियट बॉक्स’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे . या मल्टिस्टारर वेबसिरीजमध्ये अनेक कलाकार विविध भूमिकांमध्ये झळकले आहेत. शिवराज वायचळ  आणि शिवानी रांगोळे यांच्या यात मध्यवर्ती भूमिका आहेत. 

या वेबसिरीजमध्ये अनेक बड्या कलाकारांची फौज आहे.  स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, अक्षय टाकसाळे, प्रवीण तरडे, मृणाल कुलकर्णी, सुनील बर्वे आणि आशय कुलकर्णी हे मराठी कलाविश्वातील दिग्गज यात पाहायला मिळतील. लक्षवेधी भूमिकेतून अभिनेता पुष्कर जोग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यानिमित्त पुष्करसोबत पिपींगमून मराठीने खास बातचित केली. 

या व्यक्तिेखेबद्दल बोलताना पुष्कर जोग सांगतो,"ही वेबसिरीज म्हणजे क्राईम-थ्रिलर, रोमान्स, ड्रामा असं सर्वांचंच मिश्रण आहे.  मी ह्यात पुष्कर जोग ही माझीच व्यक्तिरेखा साकारतोय. या सहा भागांच्या वेबसिरीजच्या तिस-या भागात माझी  एन्ट्री होते. ह्या एपिसोडमध्ये माझी मध्यवर्ती भूमिका आहे. शाश्वतीला शोधायला निघालेला तिच्या बॉयफ्रेंड शिवराज आणि त्याची मैत्रिण शिवानी यांच्यासोबत माझी केमिस्ट्री तुम्ही पाहू शकाल, मी एका घरात अडकल्यानंतर नाट्यमय घडामोडी कशा रंगतात ते तुम्ही यात अनभवू शकता."   

"इडियट बॉक्स ही वेबसिरीज करताना खुपच धम्माल मजा आली. वेबसिरीज मल्टिस्टारर असली तरी माझे सीन्स फक्त शिवराज वायचळ आणि शिवानी रंगोळे यांच्यासोबतच होते. या दोन तरुण कलाकारांसोबत काम करायला तर मजा आलीच पण या तरुणाईकडून खुप काही शिकायला मिळालं. मला नेहमी स्वत:ला आव्हान द्यायला खुप आवडतं. वेगवेगळं्या भूमिका सााकरण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. ही माझी दुसरी वेबसिरीज आहे आणि यापुढे आणखी एक मराठी वेबसिरीज लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. पण एकूणच या थ्रीलर रॉम-कॉममध्ये काम करुन एक भन्नाट अनुभव मिळाला, त्यामुळे रसिकांनासुध्दा मनोरंजनाची पुरेपूर गॅरण्टी मिळेल यात शंका नाही. "

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive