By  
on  

चीनी पडले अक्षय कुमार आणि सोनम कपूर स्टारर ‘पॅड्मॅन’च्या प्रेमात

बॉलिवूडच्या चित्रपटांचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट परदेशात रिलिज करण्यासाठी तेथील वितरक उत्सुक असतात.सध्या चीनमध्येही एका बॉलिवूडपटाची आवर्जून वाट पाहिली जात आहे. हा बॉलिवूडपट म्हणजे पॅड्मॅन. खेड्यातीला स्त्रियांना अगदी स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणा-या व्यक्तीची गोष्ट पॅड्मॅनमध्ये आहे.

भारतात धमाल उडवल्यानंतर अक्षयचा हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी यासाठी तेथील झंझिलिया झाओ आणि विलियम फेंग या सेलिब्रिटी कपलची मदत घेतली जात आहे. यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाविषयी असलेली उत्सुकता वाढीस लागेल असं तेथील वितरकांना वाटतं.


या चित्रपटाचं दिग्दर्शन आर. बाल्की यांनी केलं आहे. स्त्रियांच्या सॅनिटेशनशी या चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटाचा नायक पत्नीसाठी सुरक्षित अशा सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करतो. या निर्मितीचा प्रवास या चित्रपटात दाखण्यात आला आहे. एका व्यक्तीची कुटूंबासाठी चाललेली धड्पड यात दाखवली असल्याने हा परफेक्ट कौटुंबिक चित्रपट असल्याचं चायनिज प्रेक्षकाचं म्हणणं आहे.

अक्षय कुमारचं चीनमधील फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. यापूर्वी चीनमध्ये अक्षयचा “टॉयलेट : एक प्रेम कथा चित्रपट रिलीज झाला होता. त्यावेळेपासून त्याचं चीनमधील फॅन फॉलोइंग वाढलं आहे. आता पॅडमॅनचा विषय महिलांच्या समस्यांकडे लक्ष वेधणारा असल्याने या निमित्ताने त्याच्या महिला फॉलोअर्स वाढ होईल यात शंका नाही.
हा सिनेमा चीनमध्ये 14 डिसेँबरला रिलीज होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive