By  
on  

#MeToo वादळात अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' सापडणार अडचणीत?

बिग बी अमिताभ बच्चन हे नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन असेलला ‘झुंड’ या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करणार यापेक्षा आनंदाची कोणतीच मोठी बातमी चाहत्यांसाठी नव्हती. पण महत्त्वाचं म्हणजे आता या सिनेमाचं भवितव्यचं अंधारात असल्याचं समजतंय. पिपींगमूनला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘झुंड’ सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यावरील लैंगिक गैरवर्तवणुकीच्या आरोपामुळे या सिनेमाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

नागराज मंजुळे यांच्या पूर्व पत्नी सुनीता यांनी त्यांच्यावर घरगुती हिंसा आणि मानसिक त्रास देण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे ‘झुंड’ भवितव्याबाबत अनिश्चिततेचे सावट आहे.

नागराज मंजुळे फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर एक सिनेमा बनवत असून या सिनेमात अमिताभ ही फुटबॉल कोचची मुख्य भूमिका साकारणार होते. सिनेमात बिग बींसोबत काम करण्यास नागराज मंजुळेसुध्दा प्रचंड उत्सुक आहेत. ते स्वत: बिग बींचे खुप मोठे चाहते असून त्यांच्या मते या सिनेमातील मुख्य भूमिकेला फक्त अमिताभ बच्चनच न्याय देऊ शकतील.

येत्या नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून नागपुरात ‘झुंड’ सिनेमाचं शुटींग सुरू होणार होतं. तोपर्यंत बिग बी आपला टीव्ही शो कौन बनेगा करोडपती आणि ठग्स ऑफ हिंदोस्तान सिनेमातून पूर्णपणे फ्री होतील. ते नागपूरमध्ये सलग 45 दिवस या सिनेमाचं शूटींग करणार असल्याची माहिती होती. तसंच संपूर्ण सिनेमाच 70-80 दिवसात पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा मानस होता.

पण आता नागराज मंजुळेवर लावण्यात आलेल्या या आरोपांमुळे जरा बिग बींसोबतचं हे नवीन समिकरण पाहायला मिळणं, जरा कठिणचं दिसंतय.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive