By  
on  

PeepingMoon Exclusive : सुशांत सिंह राजपूतच्या घराच्या भाडे करारावर सुशांत आणि रिहाचं नाव, इस्टेट एजंटची पोलिसांना माहिती

मुंबई पोलिस हे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणातील तपासणीत सगळे धागेदोरे तपासून पाहत आहेत. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार तपासणी करणाऱ्यांनी सुशांतला मॉन्ट ब्लांक अपार्टमेंटमधील घर भाड्यावर दिलेल्या इस्टेट एजंटची चौकशी केली. या चौकशीत एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. डिसेंबर 2019मध्ये भाडे करार हा तीन वर्षांसाठी सुशांत आणि त्याची मैत्रीण रिहा चक्रवर्तीच्या नावावर करण्यात आला होता. शिवाय एजंटने काही कागदपत्रांचे पुरावेही दाखवले. 
यावरून हे कपल लवकरच लग्नाच्या विचारात होतं असं चित्र पाहायला मिळतय. आणि म्हणूनच दोघं घराच्या शोधात होते. त्यांना अपार्टमेंटच्या चौंथ्या आणि पाचव्या मजल्यावरची घरही दाखवण्यात आली होती. पण सुशांतला काहीतरी मोठं हवं होतं. मग शोध करत असताना त्यांनी सहाव्या मजल्यावरी मॉन्ट ब्लांकमधील डुप्लेक्स फ्लॅटवर शिक्कामोर्तब केला होता.  एजंटने दिलेल्या माहितीनुसार सुशांत आणि रिहा दोघांनाही हे घर इतकं आवडलं की सुशांतने एका झटक्यात सगळं भाडं हे घर मालकाच्या बँक खात्यात ट्रान्सफर केलं होतं.

सुशांतला लग्नानंतर समुद्र समोर दिसणारं घर हवं होतं असं बोललं जातय. शिवाय एजंटने सुशांतला वरळी येथील एका टॉवरमध्येही घर बघण्यासाठीही विचारलं होतं, पण रिहाला बांद्रा आणि अंधेरीच्या आसपास घर हवं होत.
   

Recommended

PeepingMoon Exclusive