Exclusive: प्रकाश झा यांचा बॉबी देओल स्टारर ‘आश्रम’ ऑगस्टमध्ये रिलीजसाठी तयार

By  
on  

येत्या ऑगस्टमध्ये प्रकाश झा दिग्दर्शित आणि बॉबी देओल स्टारर ‘आश्रम’ सिरीज रिलीज होणार आहे. MX Playerवर ऑगस्टच्या तिस-या आठवड्यात ही सिरीज रिलीज होणार आहे. या सिरीजमध्ये 10 एपिसोड्स असतील. प्रकाश झा यांचा डिजीटल डेब्यु असलेल्या या सिरीजचं जोरदार प्रमोशन करण्याचं प्लॅन मॅक्स प्लेअर करत आहे.

यासोबतच आश्रमच्या दुस-या सीझनची तयारीही सुरु आहे. बॉबी देओल, चंदन रॉय सान्याल, अनुप्रिया गोयंका, दर्शन कुमार आणि सचिन श्रॉफने गेल्या वर्षी या सिरीजचं शुटिंग सुरु केलं होतं. बॉबी देओलची ही सिरीज राम रहीत याच्या जीवनावर आधारित आहे. या बाबाच्या भोवती असलेलं वलय, पडद्यामागचे कृष्णकृत्य या सिरीजच्या निमित्ताने पाहता येणार आहे. यासोबत प्रकाश झा यांचा ‘परिक्षा’ हा सिनेमा देखील झी5वर 6 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Recommended

Loading...
Share