Exclusive: Sushant Singh Rajput case: बिहार पोलीसांच्या निशाण्यावर रिया चक्रवर्ती, आज पटना पोलीसांकडून होऊ शकते रियाची चौकशी 

By  
on  

रियाची आज बिहार पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. तर रियाने अटकपूर्व जामीन लागू केली आहे. के के सिंह यांच्याकडून रियाविरुध्द एफ आय आर दाखल होण्याआधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्पेशल टीम मुंबईत पोहोचली होती. रिया आणि तिच्या परिवारावर असलेल्या चार्जेसमुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. शिवाय पटना पोलीस आणि रियाच्या या चौकशीत एक स्पेशल महिला पोलिस उपअधीक्षक त्यांच्यासोबत असेल. हे सगळं आज दुपारच्या सुमारास होईल. या सगळ्यात आता रिया आणि तिच्या परिवाराने महागडा वकील नियुक्त केला आहे. आणि जामिनासाठी अर्जदेखील केला आहे.   जशी पटना पोलीस काल रात्री मुंबईत दाखल झाली, तसं रियाने बचावासाठी वकील सतिश यांना संपर्क केला.
सुशांत सिंह राजपूतची बहीण मितूने खूप महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. रिया आणि तिच्या परिवाराची मितूला सुशांतच्या घराबाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचं तिचं म्हणणं आहे. सुशांतला मितूपासून दूर जायचं नव्हतं पण रिया स्वत:ला तासन तास रूममध्ये लॉक करत असे. ती न कळवता घर सोडून जायची आणि सुशांतचे कॉल कट करायची. रियाची आई संध्याने सुशांतवर दबाव आणला होता की त्याच्या परिवारामुळे दोघांच्या नातेसंबंधावर परिणाम नाही झाला पाहिजे. जेव्हा मितूने सुशांतची मेडीकल फाईल रियाकडून मागितली तेव्हा ती आणि तिच्या परिवाराने गोष्ट निकरावर आणली. 
सुशांतची मोठी बहीण रितूनेही रियासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण ती तिचा कॉल दुर्लक्षीत करायची.रियाने सुशांतवर खूप मोठा दबाव आणला होता. 2019मध्ये तो त्याच्या परिवारासोबत फक्त 5 वेळा बोलला होता.   सुशांत वडिलांना प्रत्येक महिन्याला पैसे पाठवत असे. पण मागील 8 महिन्यांपासून त्याने ते थांबवलं होतं.

 बिहार पोलीसांनी मुंबई पोलीसांकडे रियाच्या घरी नेण्यासाठी महिला कॉन्स्टेबलची मागणी केली आहे. काही महिला कॉन्स्टेबल हे बिहारच्या पोलीसांसोबत असतील ज्यांच्या प्रश्नांच्या उत्तरांना रियाला सामोरं जायचं आहे. लॉकडाउनच्या आधी 22 मार्चला रियाने सुशांतच्या विश्वासू बॉडीगार्डला नोकरीवरून काढलं होतं. रियाने सुशांतच्या कमाईतला मोठा भाग त्याच्या कार्डमधून खर्च केला होता. एक एड शूट, तिकीट एक्सपेन्स आणि काही शॉपिंग सुशांतच्या पैश्यातून करण्यात आली होती. एफआयआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी सुशांतला त्याच्या परिवारापासून दूर ठेवण्यासाठी, त्याच्या अकाउंटमधून पैसे चोरण्यासाठी, त्याला फोन नंबर बदलण्यासाठी दबाव करण्यासाठी आणि सुशांतच्या परिवाराला त्याच्या बिघडत जाणाऱ्या प्रकृतीची माहितीन न देण्यासाठी रियाला दोषी ठरवलं आहे.
यात विचीत्र असं हेआहे की, मुंबई पोलीसांनी जेव्हा सुशांतच्या परिवाराचं स्टेटमेंट घेतलं होतं तेव्हा कुणीच रियाचं नाव घेतलं नव्हतं. के के सिंह हे मुंबईचे सह आयुक्त पोलीसांना भेटले होते, पण तेव्हा त्यांनी रिया विषयीची कोणतीच शंका बोलून दाखवली नव्हती.  

Recommended

Loading...
Share