By  
on  

Exclusive: सुशांत सिंग राजपुतजवळच्या 50 लाखांच्या वस्तू माँट ब्लॅंक अपार्टमेंटमधून आहेत गायब

सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी पटना पोलिसांची टीम मुंबईमध्ये स्वतंत्र तपास करताना दिसत आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रबोर्तीवर आरोपपत्र दाखल केलं आहे. सुशांतच्या माँट ब्लॅंक अपार्टमेंटमधील वस्तूंची यादी पटना पोलिस करत आहेत. त्यापैकी काही वस्तू गायब असल्याचं समोर आलं आहे. या वस्तूंची किंमत जवळपास 50 लाखांच्या घरात आहे. पीपिंगमूनला एक्सक्लुसिव्हली समजलं आहे की, या घरातून सुशांतच्या आयफोनचं कलेक्शन गायब झालं आहे. 

 

सुशांतला अ‍ॅपल हा पॉवरफुल पर्सनल डिव्हाईस वाटायच. त्यामुळेच त्याने या उत्तमोत्तम फोनचं कलेक्शन केलं होतं. पण त्यातील एकही त्याच्या घरी आढळला नाही. सुशांतकडे दोन लॅपटॉप होते. त्यातील एक लॅपटॉप 1 लाख रुपयांचा होता. 
हे लॅपटॉप 2 हाय एंड कॅमे-यांशी जोडला आहे. यातील एका लेन्सची किंमत 15 लाख होती. याशिवाय त्याची दोन लाखांची सायकलही गायब आहे. त्याचे सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सही गायब आहेत. हे घटक मुंबई पोलिसांच्या यादीत नोंदवले गेले नव्हते. 
सुशांतच्या वडिलांनी पटना येथील राजीव नगर पोलिस स्टेशनमध्ये रिया विरोधात गुन्हा नोंदवला आहे. सुशांतचे वडील के. के सिंग यांनी IPC Section  341, 342, 380, 406, 420 आणि 306 कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मानसिक त्रास देणे, आत्महत्येस प्रवृत करणे असे आरोप सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबावर केले आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive