By  
on  

PeepingMoon Exclusive : मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसाठी पुन्हा धावला अक्षय कुमार, वाटले आणखी एक हजार GOQii 3.0 फिटनेस बॅण्ड्स

मुंबई पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी या करोना संकटांत अहोरात्र झटतायत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते आपल्यासाठी कर्तव्य बजावतायत. म्हणूनच पोलिसांच्या  सुरक्षेसाठी बॉलिवूडचा दानशूर खिलाडी अक्षय कुमारने त्यांना तापमान , रक्तदाब मोजणारे 1000 सेन्सर बॅण्ड दिले होते. या करोना योध्दयांना त्याने आता  VITAL 3.0.    हे अद्यावत रिस्टबँड्सचे मॉडेल दिले आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने हे अद्यावत अतिरिक्त 1000 GOQii  चे स्मार्ट वॉचेस मुंबई पोलिसांसाठी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मुंबई पोलिस कमिशनर परम बिर सिंह यांच्या उपस्थितीत महापौर बंगल्यात आज दुपारी सुपूर्त केले आहेत. याद्वारे मुंबई पोलिस हे जगातलं पहिलं असं पोलिस दल  ठरेल जे स्वत:च्या आरोग्याची तपासणी स्वत:च करु शकतील. 

यापूर्वीसुध्दा याचा ब्रॅण्ड एम्बेसेडर असलेल्या अक्षय कुमारने करोना योध्दयांसाठी GOQii बॅण्ड्स वाटले होते. यात महापालिकेचे कर्मचारी, मुंबई पोलिस, नाशिक पोलिस आणि जालंदरच्या पोलिसांना त्याने हे बॅण्ड्स सुरक्षेसाठी दिले होते. 

नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी देखील अक्षय कुमारचे आभार मानले आहेत.'कुमार यांनी रिस्टबँड्स दिल्याबद्दल आम्ही अक्षय कुमार यांचे आभारी आहोत, ज्याचा उपयोग ४५ वर्षांच्या वर असलेल्या आमच्या पोलिस कर्मचार्‍यांकडून होईल. त्यांच्या शरीराचं तापमान, रक्त दबावचा डेटा कोविड डॅशबोर्डवर गोळा केला जाईल, ज्यावर पोलिस दलाद्वारे केंद्रीय देखरेख ठेवली जाइल. बीएमआय आणि पदचिन्हांची नोंद ठेवली जातील',असं नांगरे म्हणाले. तसंच या बॅण्डद्वारे चालण्यात येणारी पावलंसुध्दा मोजता येतायत, बर्न केलेल्या कॅलरीज समजतायत.  म्हणूनच विश्वास-नागंरे पाटील यांनी नाशिकच्या  पोलिसांना फिट राहण्यासाठी दिवसभरात १०,००० पावलं चालायलाच हवीत असा नियम घालून दिला आहे. व महिन्याला सर्वात जास्त पावलं चालणा-या पोलिस योध्दयाला  २५.००० रुपयांच बक्षिससुध्दा त्यांनी जाहीर केलंय. 

तर जालंदरचे पोलिस कमिशनर गुरप्रित सिंह बुल्लार यांना या रिस्टबँड्समुळे पोलिसांच्या आरोग्याबद्दल बराच दिलासा मिळाला आहे. कंट्रोल रुममधूनसुध्दा त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवून या करोना काळात जागरुक राहता येतं, म्हणूनच हा एक चालता फिरता आयसीयू असल्याचं ते सांगतात. 

GOQii 3.0 हा सरकारचा अधिकृत फिटनेस प्रायोजक असून स्त्री व पुरुष अशा दोघांसाठी हे रिस्टबँड्स आकर्षक रंगात उपलब्ध आहेत. तसंच ते वॉरप्रुफ असून वेळही दर्शवतं. बेलबॉटम या बॉलिवूड सिनेमाचा निर्माता जॅकी भगनानीनेसुध्दा संपूर्ण सिनेमाच्या टीमसाठी 150 रिस्टबँड्स मागवले आहेत. यामुळे संपूर्ण सिनेमाच्या कलाकारांसह टीमच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येणार आहे. 

पोलिस दलाचे मनोबल उंचाविण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अक्षय कुमार यानं  मुंबई पोलिसांना अतिरिक्त  1000  फिटनेस रिस्टबँड्स दिले आहेत. या रिस्टबँड्समुळं मुंबई पोलिसांना खुप मदत होणार आहे.

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive