PeepingMoon Exclusive : तो पुन्हा येतोय ! यशराज फिल्म्सचा दमदार एक्शन पॅक 'पठाण'मध्ये शाहरुख खान

By  
on  

बॉलिवूडचा बेताज बादशाह अर्थातच अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची दीर्घ प्रतिक्षा अखेर संपणार आहे. लवकरच चाहते आपल्या लाडक्या किंग खानला मोठ्या पडद्यावर पाहणार आहेत. शाहरुखचा आनंद .एल राय दिग्दर्शित झिरो हा अखेरचा सिनेमा २०१८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर शाहरुख फक्त आपल्या सिनेमा आणि वेबसिरीज निर्मितीकडेच लक्ष केंद्रित करत होता.

पण आता पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार शाहरुखने यशराज फिल्म्सचा एक आगामी सिनेमा साईन केल्याचं कळतंय. यशराज फिल्म्सचं यदांचं हे ५० वं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. याचनिमित्ताने शाहरुखने साईन केलेल्या सिनेमाची अधिकृत घोषणा पुढच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे. 

पिपींगमूनच्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार शाहरुखच्या या सिनेमाचं नाव पठाण असणार आहे आणि तिच व्यक्तिरेखा तो सिनेमात साकारतो आहे. ही एक एक्शन फिल्म असेल.  २०१९ मध्ये यशराज फिल्म्सला सुपरहिट वॉरसारखा सिनेमा देणारे सिध्दार्थ आनंद हे पठाणच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार पठाणची स्क्रिप्ट पूर्णपणे तयार झाली आहे तसंच किंग खानने अधिकृतरित्या करार केल्याचं समजतंय. आता फक्त यशराज टीमसोबत बसून एसआरकेला शूटींगच्या तारखा ठरवायच्या आहेत. 

पुढच्याच महिन्यात यशराज फिल्म्स ५० वं सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं करतंय. यादरम्यान आदित्य चोप्रा या सिनेमाची घोषणा करु शकतं आणि पुढच्या वर्षी २ ऑक्टोबर २०२१ ही पठाणजी रिलीज डेटही यासोबत जाहीर करु शकतो. सर्वांचच लक्ष आता या घोषणेकडे लागलं आहे. 

दिग्दर्शक सिध्दार्थ यांना वॉरसारखचं या एक्शनपॅक ड्रामाचं शूटींग जगभर करायचं आहे. परंतु सध्या करोना संकटामुळे ते थोडं मुश्कील असल्याचं चित्र असल्याने आदित्य चोप्रा चांगल्या लोकेशन्सच्या शोधात आहेत. पठाणची येत्या ऑक्टोबरमध्ये शूटींग सुरु होणं गरजेचं आहे, परंतु याबबात अद्याप कुठलीच तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. 

शाहरुख खानला ब-याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत. 

Recommended

Loading...
Share