Exclusive: आयुष्मान खुराणा आणि वाणी कपूरच्या सिनेमात दिसणार ट्रांसजेंडर लव्हस्टोरी

By  
on  

अनेक विविध भूमिका साकारल्यानंतर आयुष्मान आता ट्रान्सजेंडर लव्हस्टोरी साकारण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत वाणी कपूर दिसणार आहे. या सिनेमाचं शुटिंग ऑक्टोबरमध्ये सुरु झालं आहे. पीपिंगमूनला मात्र एक्सक्लूसिव्हली समजलं आहे की, हा सिनेमा ट्रान्सजेंडर लव्हस्टोरी असणार आहे.

 

एका सुंदर मुलीशी लग्न केल्यानंतर हिरोला समजतं की ती ट्रान्सजेंडर आहे. यानंतर ही जोडी कोण-कोणत्या संघर्षाला सामोरी जाते हे या सिनेमात पाहता येईल. वाणी या सिनेमात ट्रान्सजेंडर व्यकीची भूमिका साकारणार आहे. 
गंभीर विषयाला हलक्या –फुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आयुष्मान या सिनेमात अ‍ॅथलीटची भूमिका साकारणार असल्याने त्याचा हटके अवतार प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अभिषेक आणि आयुष्मान पहिल्यांच एकत्र काम करणार आहेत. हा सिनेमा ऑगस्ट 2021 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Recommended

Loading...
Share