Exclusive: ‘गुंजन सक्सेना’ साकारण्यात आहेत जान्हवीचे अतुल परिश्रम

By  
on  

मला इतरांविषयी माहिती नाही, पण गुंजन सक्सेना हे नाव मी तोपर्यंत ऐकलं नव्हतं जोपर्यंत जान्हवी कपूरच्या सिनेमात कारगिल युद्धात दाखवलेला पराक्रम धर्मा प्रॉडक्शनच्या नेटफ्लिक्सवर आज रिलीज झालेल्या बायोपिकमध्ये पाहिला नव्हता. 
मी कारगिल युद्ध एक न्युज एडिटरच्या रुपात कव्हर केलं होतं. त्यावेळी 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयींनी या विजयाची घोषणा केली होती. त्यावेळी करण जोहरने रिटायर्ड झालेल्या IAF पायलट गुंजन सक्सेनावर सिनेमा बनवला नव्हता. तोपर्यंत तिच्याविषयी भारतात कुणालाही माहिती नव्हतं. 

गुंजन सक्सेना या शौर्य चक्र मिळवणा-या पहिल्या महिल्या आहेत. त्यांच्या नावे कारगिल बूकमध्ये एक चॅप्टरही आहे. ज्याचं नाव कारगिल: अनटोल्ड स्टोरी फ्रॉम द वॉर असं आहे. हा त्यांच्या शौर्यावर बेतला आहे. जान्हवीच्या उत्तम अभिनयानंतर देश गुंजन यांच्याकडे कौतुकाने पाहत आहे.मला IAF कडून सेंट्रल बोर्ड ऑफ़ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC, the censors) ला लिहिलेल्या तक्रारीत काही तथ्य नसल्याचं वाटतं. यात एअर फोर्सची प्रतिमा नकारात्मक दाखवली गेली असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.

याशिवाय IAF स्त्री पुरुष समानतेवर भर देत असल्याचंही यात म्हटलं आहे. मला त्याबाबत शंकाही नाही. पण 1994 मध्ये गुंजन वयाच्या 24 व्या वर्षी कारगिल युद्धात भाग घेणारी एकमेव मुलगी होती. कारण सैन्यात स्त्रिया असणं हे सहज स्विकारलं जात नव्हतं. 2015मधील मोदी सरकारच्या निर्णयाने महिलांच्या युद्धभूमीवर असण्याला बळ दिलं. 1973च्या जंजीर मध्ये अमिताभला पोलिस इन्स्पेक्टरच्या वेषात पाहून लोक प्रेरित झाले होते. त्याचप्रमाणे आता गुंजनला पाहून होतील यात शंका नाही. आपल्याकडे 9449 महिला सैन्यात आहेत. संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितलं की 102 महिल्या सैन्यात आल्या आहेत. 

गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल मुळे हा ट्रेंड बदलेल. जान्हवीने गुंजन उत्तम साकारली आहे. मृदू स्वभावाची, अपमानित झालेली, अनेक शारिरीक आणि मानसिक आव्हांनांना तोंड देत तिने IAF पायलट साकरली आहे. गुंजन सक्सेना यावर म्हणतात, ‘ तुम्हाच्याकडे इच्छाशक्ती आणि कौशल्य असेल तर तुमच्यासाठी IAF चे दरवाजे खुले आहेत. 

या सिनेमात IAF ची नकारात्मक भूमिका कुठेही दिसून येत नाही. गुंजन सक्सेना एक कौतुकास्पद सिनेमा आहे. डायरेक्टर शरण शर्मा गुंजनचे 40 मिशन दाखवू शकले असते. पण त्यांनी एकच दाखवलं. गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल हा सिनेमा बिना मेक अप आणि ग्लॅम कॉस्च्युमची एक प्रेरणादायी गोष्ट आहे. जान्हवीला ट्रोल करण्याऐवजी  IAF ची पोस्टर गर्ल बनायला काहीच हरकत नाही.

Recommended

Loading...
Share