PeepingMoon Exclusive: करण जोहरने केली मुलांच्या पहिल्या पुस्तकाची घोषणा, मुलांना नेहमी देतो आई-वडीलांचं एकत्रित प्रेम

By  
on  

करोना लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी नवनव्या गोष्टी-छंद जोपासणे यांना वाव दिला आणि त्यासाठी तितका वेळ सर्वांना पहिल्यांदाच मिळाला होता. रोजच्या बिझी शेड्यूलमधून असं निवांत होऊन प्रत्येकाला काहीतरी करावंसं वाटतं. सेलिब्रिटी याला अपवाद नाहीत. तसंच काहीसं प्रसिध्द निर्माता करण जोहरच्या बाबतीत घडलं आहे. करण कुठल्याही धर्मा प्रोडक्शनच्या आगामी सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत नव्हता. तर करणने लहान मुलांसाठी त्याचं पहिलं पुस्तक लिहलं आहे.   'द बिग थॉट्स ऑफ लिटिल लव' असं त्याच्या पुस्तकाचं नाव असून त्याने नुकतीच त्याची घोषणा केली आहे. 

करण जोहरने या पुस्तकाचं संपू्र्ण श्रेय त्याची जुळी मुलं यश आणि रुही यांना दिलं आहे. तसंच करण लवकरच यासंदर्भात एक व्हिडीओसुध्दा प्रदर्शित करणार आहे. यात तो आपला पालकत्वाचा अनुभव सांगताना दिसेल. तसच यश आणि रुहीचीसुध्दा त्याला यात गोड साथ लाभेल. 

बॉक्स ऑफीसवरील सुपरहिट सिनेमे  'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो', 'कभी अलविदा ना कहना', 'माई नेम इज खान', 'स्टुडंट ऑफ़ द ईयर', 'बॉम्बे टॉकीज', 'ऐ दिल है मुश्किल' आणि  नेटफ्लिक्स एंथोलोजी 'लस्ट स्टोरीज' आणि 'घोस्ट स्टोरीज' चा स्क्रीनप्ले रायटर असलेल्या करण जोहरसाठी या पुस्तकाचं लिखाण खुपच वेगळं ठरलं. यात लॉकडाऊनमध्ये चिमुकल्या यश आणि रुही सोबत घालवलेला क्वालिटी टाईम हा करणच्या 'द बिग थॉट्स ऑफ लिटिल लव' या पुस्तकासाठी कारणीभूत आहे. 

मला आठवतंय मे 2017 रोजी करण जोहरने माझ्यासोबत त्याच्या पालकत्वाच्या पहिल्या अनुभवाबाबत गप्पा मारल्या होत्या. त्यानंतर 7 फेब्रुवारीला यश आणि रुहीचा जन्म झाला. जेव्हा यश आणि रुही हॉस्पिटलमधून घरी आले, तेव्हा करण 'पॅटर्निटी लिव्ह'वर होता. त्याच्या डोळ्यांना झोपच माहिती नव्हती. त्याची मुलंचं त्याचं संपूर्ण आयुष्य बनून गेली. बॉलिवूडचा हा हरहुन्नरी व्यक्ती सिंगल पॅरेंट असूनही मुलांचा आई-बाबा दोन्ही बनला. 

यश आणि रुहीच्या जन्मानंतर करण सांगत होता, " या दोघांच्या येण्याने माझं आयुष्य खुप बदलून गेलं आहे. हा खुप मोठा बदल आहे. 44 वर्षाच्या वयात माझा हा सर्वात मोठा ब्लॉकब्लस्टर आहे. अजूनही कधी कधी माझा ह्यावर विश्वासच बसत नाही. मी त्यांच्यात प्रचंड गुरफुटून गेलो आहे. माझ्या आयुष्यातील रिकामंपण ह्यांच्यामुळे भरुन निघालं. त्यांनी एक नवी झळाळी मला दिली. त्यांच्या खेळण्या-बागडण्याला मी भान हरपून पाहत बसतो.

जेव्हा यश आणि रुहीचा जन्म झाला होता. तेव्हा मी स्वत:ला समजावलं की मला आता, प्रवास माझ्या कामाच्या वेळा, कमिट्मेंट्स सर्व नंतर आणि आधी या दोघांची देखभाल, पालन-पोषण आणि प्रेम देणं ही माझी पहिली जबाबदारी राहिल.तसंच मी आता आणखी एक विचार केला आहे तो म्हणजे, जेव्हा ते शाळेत आणि अभ्यासात बिझी होतील त्यापूर्वी मला त्यांना धर्मा प्रोडक्शनला घेऊन जायचंय, मला असं वाटतं त्यांनी माझी सर्व कामं आत्तापासूनच हळूहळू जाणून घ्यावीत. मी त्या दिवसाची वाट पाहतोय , जेव्हा ही दोघं  माझ्यासोबत आऊटडोअर शूटींगला येतील. बेबोचा मुलगा तैमूर हा यश आणि रुही पेक्षा काही महिन्यांनीच मोठा आहे, त्यामुळे त्यांची छान जोडी जमते.मी आणि बेबो तर आत्तापासूनच आमचं मुलांसोबतचं व्हॅकेशन प्लॅन करतोय. 

1998 साली माझा पहिला सिनेमा कुछ कुछ होता है चा प्रिमियर होता त्या दिवसासारखाच माझा यश आणि रुही जेव्हा घरी आले तो क्षण होता. पण भावना आवरुन मी स्वत:ला समजावलं की मला एक जबाबदार वडीलांची भूमिका पेलायची आहे.

 

अशातच आता करण जोहरच्या पुस्तकाची वाट पाहणं खुपच उत्कंठा वाढवतोय. ह्यात करणने मुलांच्या संगोपनाबद्दल बरंच काही लिहलंय. तसंच मुलाला आणि मुलीला वाढवताना नकळत का होईना पण आपण कसा भेदभाव करतो. हेसुध्दा निदर्शनास आणलं आहे. लवकरच हे पुस्तक प्रकाशित होतंय. मुलांसाठीच्या आकर्षक पुस्तकाचा लाभ त्याचं संगोपन करणा-या आई-वडीलांसाठी जास्त फायदेशीर ठरेल. 

 

 

Recommended

Loading...
Share